मुसाफिर

252.00

Out of stock

पुस्तकाचे नाव मुसाफिर
लेखक अच्युत गोडबोले
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ५०६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ४४७ ग्रॅम

Description

अच्युतचं ‘मुसाफिर’ हे आत्मचरित्र जनमानसांत एक नवी लाट निर्माण करणारं ठरेल याची मला खात्री आहे. मानसशास्त्रावरच्या ‘मनात’ या पुस्तकानं मराठी पुस्तकजगतात एक मैलाचा दगड म्हणून ही गोष्ट सिद्ध केलीच आहे. मी नेहमीच अच्युतच्या लिखाणानं, त्याच्या कुतूहलानं. वैविध्यपूर्ण विषयात असलेला त्याचा रस यानं आणि त्याच्या ज्ञानानं स्तिमित होतो… ‘मुसाफिर’ साठी खूप शुभेच्छा!

– कुमार केतकर

अच्युतच्या या पुस्तकाने मला चकित केलं आहे… त्याचं सगळं व्यक्तित्व अफाट आहे… कुठे शहाद्याचे आदिवासी… आणि कुठे ते अमेरिकेतले सॉफ्टवेअर कंपन्यांचे प्रमुख मालक. ‘मुसाफिर’ म्हणजे… दहा दिवसांत सगळं तुरुंगविश्व उलगडणाऱ्या लेखकाची किती भेदक आणि व्यापक नजर…. तीच गोष्ट वेश्यांच्या वस्तीबाबत…. थक्क करणारं लिखाण… या सगळ्यांमध्ये दिसणारी त्याची व्यापक आत्मीयता… या लिखाणाला वाः म्हणायला धीर होत नाही. कारण ते वाः च्या पलीकडलं आहे…

-अनिल अवचट

….साठी पार केलेल्या उत्साही, विचारी तरुणाचा आपल्या सुसंस्कृत विचार, समृद्ध जीवनाचा हा निव्वळ आत्मचरित्रात्मक लेखाजोखा नसून अच्युतने स्वतःला ढवळून काढून अत्यंत तन्मयतेने घेतलेला हा रोचक स्मृती-मधुर व स्मृती गंभीर असा कालौघाचाही आढावा आहे….. सर्वच वयाच्या भारतीय तरुणांनी वाचलेच पाहिजे असे वाचकाला श्रीमंत करणारे हे भरगच्च आत्मनिवेदन…! – – – -अरुण साधू

अच्युत गोडबोले यांचे हे आत्मचरित्र अद्भुतरम्य आहे, कारण सॉफ्टवेअरच्या अवघड, स्पर्धात्मक क्षेत्रात मोठी मजल मारणारा हाच माणूस विद्यार्थिदशेपासून अर्थशास्त्र, संगीत, साहित्य, जागतिक राजकारण, समाजशास्त्र या विविध विषयांचा, पुढे त्यावर पुस्तके लिहिण्याइतका सखोल अभ्यास करतो, कधी समाजकार्य करताना तुरुंगातही जातो हे सगळे लोकविलक्षण आहे… एक अत्यंत वाचनीय, माहितीपूर्ण आणि ‘सकारात्मक जगण्याची कला शिकवणारे’ उपयुक्त पुस्तक !

– रत्नाकर मतकरी

अव्वल दर्जाची बुद्धिमत्ता, अफाट ऊर्जा, कोणताही गोष्टीचा थेट मुळापर्यंत घुसून शोध घेण्याची असोशी ही अच्युत गोडबोले यांची काही वैशिष्ट्येच त्यांचे असाधारण असणे दाखविण्यास पुरेशी आहेत, ज्ञानाच्या क्षेत्रात इतकी खोलवर बुडी मारून ते सगळं इतकं सोपं करून सांगणारा आणखी कोणी आज मला तरी दिसत नाही. रंगनाथ पठारे जगण्याच्या, अच्युत गोडबोले यांचं हे पुस्तक मी कुठल्याही वयाच्या कुठल्याही क्षेत्रातील वाचकास तेवढ्याच विश्वासाने वाचण्यास देईन. विद्यार्थ्यांना, तरुणांना तर आग्रहाने देईन; कारण स्वैराचार आणि कलंदरपणातील भेद स्पष्ट करणारी ही ‘बेफाम कलंदरीची वेगवान रोलर कोस्टर राइड’ त्यांनाही अच्युत गोडबोलेंप्रमाणे आंतरराष्ट्रीय यशाचा मार्ग आखून देईल.

– अनंत सामंत

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मुसाफिर”

Your email address will not be published. Required fields are marked *