Description
ए. पी. जे. अब्दुल कलाम हे स्वतंत्र भारतातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. शास्त्रज्ञ, नेता, विचारवंत, शिक्षक आणि लेखक अशा विविध भूमिकांतून त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत देदिप्यमान यश प्राप्त केलं. विकसित भारताची जी कल्पना त्यांनी मनात जोपासली त्याप्रति अत्यंत समर्पित भावनेने केलेल्या त्यांच्या कामामुळे ते समस्त भारतवासियांशी घनिष्टपणे जोडले गेले. लोकांशी वागण्या-बोलण्याची त्यांची साधी सरळ आणि थेट पद्धत तसंच, सर्वाप्रति त्यांना वाटणारं सखोल प्रेम यामुळे प्रत्येकालाच त्यांच्याविषयी आत्मियता वाटत असे.
‘माझे जीवन’ ही डॉ. कलाम यांनी शब्दबद्ध केलेली त्यांचीच जीवनगाथा आहे. रामेश्वरमध्ये त्यांचं बालपण गेलं. तिथून सुरू झालेला प्रवास त्यांनी यात रेखाटला आहे. भारताच्या अंतराळ आणि मिसाईल मोहिमेत ते सहभागी होते. भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून त्यांनी पदभार सांभाळला. उर्वरित आयुष्यात त्यांनी शक्य तितक्या लोकांच्या, विशेषतः तरुणांच्या भेटीगाठी घेतल्या. हे सर्व त्यांच्या सहजसुंदर आणि ओघवत्या शैलीत आपल्याला वाचायला मिळतं.
कठोर परिश्रम, समर्पित वृत्ती, धैर्य आणि सर्जनशीलता या साऱ्यांचं महत्त्व त्यांच्या स्वतःच्या कार्यातून आपल्या समोर येतं. उल्लेखनीय जीवनाचं दर्शन घडवणारं त्यांचं हे चरित्र प्रेरणादायी आहे. यातील सोप्या भाषेला सुंदर रेखाचित्रांची जोड आहे. ‘माझे जीवन’ सर्व वयाच्या वाचकांना प्रेरणादायी ठरेल.
Reviews
There are no reviews yet.