गवंड्यांचं पोर

180.00

Out of stock

पुस्तकाचे नाव गवंड्यांचं पोर
लेखक सुभाष चांदोरीकर
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १४८
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १४० ग्रॅम

Description

आचार्य सुभाष चांदोरीकर हे प्रसिद्ध ख्रिस्ती उपदेशक, साहित्यिक व दलित ख्रिस्ती चळवळीचे प्रेरक आहेत. त्याचप्रमाणे एइस, तृतीय पंथीयांचे मानवी अधिकार, जातीय विषमता, महिला सबलीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. त्याचप्रमाणे दहशतवाद, ख्रिस्ती लोकांच्या राखीव जागेचा हक्क, वृद्धांच्या व्यथा व कथा, विरप्पन गरिबांचा अन्नदाता, ख्रिस्ती धर्मांतराने जात गेली का? या अनेक वास्तववादी विषयांवर लेख प्रसिद्ध झालेले आहेत.

ईश्वरविज्ञान पाठशाळेत त्यांनी प्राध्यापक म्हणून ख्रिस्ती धर्मगुरूंना ११ वर्षेशिक्षण दिले. समाजातील वंश आणि वर्णभेद याविषयी अभ्यास करण्यात अक्षेसर म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे दर्बन येथे आयोजित केल्या गेलेल्या वर्णभेद परिषदेस उपस्थित राहून त्यांनी वेश्याव्यवसाय करणाऱ्या दलित महिलांवर धर्माचे बंधन लादले जाते या विषयावर शोधनिबंध सादर केला. २००२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने गौरविण्यात आले. २००४- मध्ये ६ व्या महाराष्ट्र दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ख्रिश्चन धर्मांतरित ब्राह्मण व दलित यांचे नाते काय? या पुस्तकाद्वारे धर्मातील जातीभेद नष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. देवासमोर सर्वजन समान आहेत. हाच बोध त्यांनी दिला आहे.