Description
श्री. जाधव हे कार्यक्षम आणि कर्तव्यदक्ष तर होतेच; पण त्याबरोबरच नम्र आणि ऋजूही होते. त्यांचा स्वतःचा इतिहास विषयाचा दांडगा अभ्यास आहे. त्यांची वृत्ती व्यासंगी आणि जिज्ञासू आहे. अधिकार वापरण्यापेक्षा शांतपणे व संयमाने सर्वांचे सहकार्य मिळवण्याचे त्यांचे उद्दिष्ट असायचे. बालभारतीचे पुस्तक जास्तीत जास्त बिनचूक व दर्जेदार होण्यासाठी कितीही कष्ट घेण्याची त्यांची तयारी असायची. चित्रकारांनी रेखाटलेली चित्रे जर काही त्रुटींनी युक्त असतील, तर त्यांच्याकडे पुनःपुन्हा जाऊन आवश्यक ते बदल करून घेण्याचा त्यांना कंटाळा नसे. समितीच्या सदस्यांपैकी कुणाला काही संदर्भग्रंथ हवे असतील, तर ते अगदी थोड्या वेळात ग्रंथालयातून आमच्यापुढे हजर करीत असत. कोणतेही काम पुढे न ढकलता तत्काळ पार पाडण्याची तत्परता त्यांच्याकडे होती.
– डॉ. आ. ह. साळुंखे
Reviews
There are no reviews yet.