Description
श्री बसवेश्वर हे बाराव्या शतकातील एक महान व्यक्तिमत्व. ते कन्नड़ भाषेतील श्रेष्ठ कवी म्हणून तर मानले जातातच. शिवाय एक थोर संत, समाजसुधारक आणि प्रेषित म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. श्री बसवेश्वर वीरशैव संप्रदायाचे संस्थापक होते. त्यांची वचने कन्नड़ भाषेचा अमूल्य ठेवा आहेत.
भारतीय समाज मूलत: कर्मठ असल्यामुळे त्याच्या समाजशास्त्रीय चौकटीत गंभीर स्वरूपाचे बदल होत नाहीत. यात सत्याचा अंश असेलही, परंतु येथे शिष्टमान्य सामाजिक मूल्यांच्या विरुद्ध झगडणारे बंडखोर निपजल्याचीही उदाहरणे आहेत. स्वत:च्या श्रद्धा समाजमनावर ठसवून त्यांनी आपल्या स्वप्नांनुसार समाजाला आकार देण्याचा प्रयत्न केला. भारतीय इतिहासातील बसवेश्वर हे असेस दुर्लभ व्यक्तित्व होते. त्यांच्या पंथातील लोकांचा तो प्रेषित आहे. समाजशास्त्राच्या अभ्यासकांना एक समाजसुधारक आणि क्रांतिकारक म्हणून त्याचे महत्त्व वाटते, तर काहींना समाज – सुधारक आणि प्रेषित म्हणून त्याचे मोल वाटते.
Reviews
There are no reviews yet.