Description
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे (1891-1956) नाव भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या शेवटच्या कालखंडातील सामाजिक व राजकीय इतिहासात प्रामुख्याने घ्यावे लागेल. अस्पृश्यांचा प्रश्न हा एक राष्ट्रीय प्रश्न होता आणि तो सोडविण्यासाठी त्यांनी आपले सबंध आयुष्य वेचले. त्यांनी केलेल्या चळवळीमुळे त्यांचे राष्ट्रीय नेत्यांच्या मालिकेतील स्थान अढळ झाले आहे. डॉ. आंबेडकर राजकारणी होते. पण त्यांच्या राजकारणाला विद्वत्तेची झालर होती. न्यायमूर्ती रानाडे, भांडारकर, तेलंग, लोकमान्य, टिळक यांचा विद्वत्तेचा वारसा पुढे चालवून देशाचे राजकारण करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक महान नेते होते.
Reviews
There are no reviews yet.