डॉ. आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना

360.00

1 in stock

पुस्तकाचे नाव डॉ. आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना
लेखक रावसाहेब कसबे
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २९६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ३०० ग्रॅम

Description

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारप्रणाली आणि भारतीय राज्यघटना आज अभूतपूर्व अशा संकटात सापडलेल्या आहेत. एकीकडून अरुण शोउरी यांच्यासारखे सत्तालोलुप पत्रकार आंबेडकरांची प्रतिमा जाणीवपूर्वक बदनाम करून वांझोट्या सामाजिक संघर्षासाठी वातावरण उद्दीपित करण्याचा प्रयत्न्न करीत आहेत; तर दुसरीकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख विचारवंत दत्तोपंत ठेंगडी प्रौढ मताधिकार आणि प्रादेशिक मतदारसंघ यांच्यावर आधारलेल्या आजच्या राज्यघटनेला उच्चवर्णीय आणि जातीय उद्योजकांच्या हातात राजकीय सत्ता पुन्हा जावी म्हणून इटलीत मुसोलिनीने अंमलात आणलेल्या कार्यात्मक Functional प्रतिनिधित्वावर आधारलेल्या ‘खास भारतीय ढंगाच्या’ अध्यक्षीय पद्धतीचा पर्याय पुढे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ‘डॉ. आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना’ या ग्रंथाच्या नव्या आवृत्तीच्या निमित्ताने’ डॉ. राव साहेब कसबे यांनी लिहिलेली दीर्घ प्रस्तावना या दोन्हीही प्रयत्नांची मुळातून समीक्षा करणारी आहे.
हा ग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या राज्यघटनेच्या प्रारूपासंबंधी आणि प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या राज्यघटनेसंबंधी भारताच्या सामाजिक इतिहासाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करणार आहे. हा ग्रंथ २००० सालापर्यंत झालेल्या प्रमुख घटना दुरुस्त्या आणि संवैधानिक प्रश्नांवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या प्रमुख निकालांची सविस्तर माहिती देणारा असल्यामुळे, ती भारतीय राज्यघटनेवरील एक अद्ययावत ग्रंथ बनला आहे. म्हणूनच हा भारतीय राजकारण आणि राज्यघटना यांच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरणारा आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “डॉ. आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना”

Your email address will not be published. Required fields are marked *