Description
” अण्णाभाऊंचे साहित्य मार्क्सवादी की आंबेडकरवादी असा खडा सवाल तयार झाल्यास मार्क्सवादी असच उत्तर द्यायला हवं. ते मान्य होईल की नाही याचा विचार करु नये. कारण कोणी तरी मान्य करावं यासाठी हे उत्तर नाहीय तर ते वास्तव आहे. पण या वास्तवापासून दूर जाण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे. गंमत म्हणजे अण्णा भाऊ स्वत: च्या साहित्याच्या प्रेरणा काय सांगतात, साहित्याचे प्रयोजन काय सांगतात, मार्क्सवादाचा परिणाम अण्णा भाऊ कोणत्या शब्दांत सांगतात हे ही अण्णाभाऊंना या ना त्या तंबूत ओढणारे पहात नाहीत. अण्णाभाऊ आज असते तर ते सारं पाहून हसले असते आणि काही करा पण मला माणसाबाहेर काढू नका, मार्क्सवादाबाहेर काढू नका असं म्हटलं असतं . ”
Reviews
There are no reviews yet.