Description
मैत्रवेल दोन जीवांच्या मैत्रीची, प्रेमाची कहाणी…
नाते संबंधातील रुसवे फुगवे आणि सुख दुःखाची कहाणी …
मैत्रवेल मित्रांच्या सानिध्यात घालवलेले अनमोल क्षण…
मैत्रवेल म्हणजे नात्याची अलगत उलगडत जाणारी रेशीम गाठ…
मैत्रवेल म्हणजे गार्गी आणि सचिन यांच्या नात्यातून निर्माण झालेल्या मैत्रीची आणि मैत्रीतून बहरत जाणाऱ्या प्रेमाची कथा. वाचकांना एका वेगळ्या अनुभवाचा प्रत्यय देते आणि आणि जीवनातील मैत्रीचे, प्रेमाचे महत्व समजावून सांगते.
आयुष्यात सगळेच मैत्री करतात, याच मैत्रीतून प्रेम होते. वेगवेगळे चटके मैत्री देते आणि वेळ प्रसंगी प्रेमाची फुंकर सुद्धा मैत्री घालते.
जीवन मैत्रीशिवाय आणि प्रेमाशिवाय तसे अपुरेच आहे. सचिन आणि गार्गी यांच्या आयुष्यातील कॉलेजमधील आणि कुटुंबातील अनोख्या प्रसंगातून हि कादंबरी बहरते. आपल्याला अलगद सुखावून जाते; अन प्रेमळ मैत्रीची जाणीव करून देते.
Reviews
There are no reviews yet.