Description
वेदना आणि प्रतिभा यांचा संगम म्हणजे साहित्य असेल तर किसन चव्हाण या पारधी तरुणाचं ‘आंदकोळ’ हे आत्मकथन एक उत्कृष्ट साहित्य कलाकृती ठरायला हवी. मराठी साहित्याच्या अवकाशात खोलवर विस्तारणारे एक वादळ म्हणजे हि कलाकृती आहे. परंपरेने दिलेलं वेदनामय आयुष्य, माणूस म्हणून नाकारलेली ओळख आणि कपाळावर जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का घेऊन जगणं काही सोपं नसतं. अंगण नसलेल्या आयुष्यात ठाण मांडून बसलेल्या आणि क्षणाक्षणाला आपली नखं वाढवून जखमांचा जल्लोष करणाऱ्या वेदनांविरुद्ध बंड करणं, विद्रोहाचं रणशिंग फुंकणं आणि श्वासागणिक एल्गार पुकारण, हेही सोपं नसतं. किसन चव्हाण याने स्वतःसाठी आणि भोवतालच्या बिनचेहऱ्याच्या समाजासाठी सातत्याने युद्ध जागे ठेवणारी तुतारी फुंकली आहे. या तुतारीच्या युद्धभेदी आवाजातूनच हे आत्मकथन जन्माला आलं आहे. व्यवस्थेशी दोन हात करत तिचा बुरखा फाडणारं आणि माणसाला आत्मसन्मानाने भरलेला चेहरा बहाल करणारं हे आत्मकथन मराठी साहित्याचे सर्व पारंपरिक मापदंड मोडून मैलाचा नवा दगड ठरावं, असं मला वाटतं. काळजातून बाहेर पडलेलं ‘आंदकोळ’ साहित्याचा चेहरामोहरा बदलून टाकेल, अशीही मला आशा आहे …
-उत्तम कांबळे,
पूर्वाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
Reviews
There are no reviews yet.