Description
ग्रंथपाल त्यांना म्हणाला, “मिस्टर, हे ग्रंथालय आहे. ते समोरचे बोर्ड बघा.” समोरच्या भिंतीवरचा सूचनावजा बोर्ड होता, “येथे काही खाऊ नये, स्वच्छता राखा.” बाबासाहेबांनी भिंतीवरचा तो फलक पाहिला, वाचला आणि मान खाली घातली, “हा येथला नियम तुम्ही मोडला आहे, अपराध केला आहे. तुम्हाला शिक्षा करावी लागेल.” समजलात? ग्रंथपालाने सांगितले.
” क्षमा करा. यापुढे मी सुचनेचे पालन करीन. उपाशी राहून येथे वाचत बसेन, मग तर झाले?” बाबासाहेब म्हणाले.
“अपराध करणाऱ्याला क्षमा करता येत नाही.” ग्रंथपाल.
“शिक्षा करा. पण एक विनंती आहे.” बाबासाहेब.
“कोणती?” ग्रंथपालाने विचारले.
“माझ्यासाठी हे ग्रंथालय बंद करू नका. ग्रंथाशिवाय मी जगू शकत नाही, म्हणून या व्यतिरिक्त कोणतीही शिक्षा दया. मी ती भोगायला तयार आहे” बाबासाहेबांनी सांगितले. ग्रंथावरील हे अजोड प्रेम पाहून गोरा ग्रंथपाल मनातून सुखावला. ग्रंथाच्या वेडाने ग्रंथपाल भारावून गेला. म्हणाला, “मिस्टर आंबेडकर, तुम्ही उदयापासून माझ्याबरोबर जेवायचे ही तुम्हाला शिक्षा आहे. मी तुमचे जेवण आणत जाईन.”
Reviews
There are no reviews yet.