Description
महान प्रभूतींच्या भाषणांना बदलत्या कालपटावर
एक सखोलता, स्वतंत्रता तसेच मर्मभेदक अर्थपूर्णता प्राप्त असते.
२० व्या शतकातील जगात बदल घडवणारी भाषणे, त्याचे हे नेटके संकलन व संपादन आहे. ही भाषणे सत्ताकांक्षा – युद्धे, एकसंघता व विभाजन यांचे निदर्शन करतात. यातून थेट व्यक्त होणारा पराकोटीचा द्वेष आणि आशावाद, प्रेम – करुणा, वेदना व जीवघेणी दुःखे, राजकारण तसेच मुत्सदेगिरी या सारख्या गोष्टींना आज एक ऐतिहासिकता प्राप्त झालेली आहे.
महात्मा गांधी, मार्टिन ल्यूथर किंग ज्यू, लेनिन, स्टॅलिन, अडॉल्फ हिटलर, जॉन. एफ. केनडी तसेच इंदिरा गांधी, अरुंधती रॉय अशा एक ना अनेक प्रभावी व प्रगल्भ वक्त्याच्या भाषाणातून त्यांचे द्रष्टेपण, त्यांची तळमळ, त्यातील टीका – टिप्पणी व तत्त्वे ही अभ्यासण्यासारखी आहेत.
एकूणच, ही भाषणे आधुनिक जगाचा आशावाद – खेद वा खंत व्यक्त करतात. त्यातील तीक्ष्णता व प्रभावी – परिणामकारकता तुम्हाला भावल्याखेरीज राहणार नाही.
Reviews
There are no reviews yet.