Description
वामनदादांची अनेक गीते प्रकाशित आहेत आणि काही अप्रकाशित आहेत. परंतू याबाबतचा एक खजिना मात्र माझ्या हाती नांदेडमधील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ गायक ललकार बाबू यांच्या माध्यमातून मात्र प्राप्त झाला. वर्ष 2022 मध्ये बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी या आपल्या पक्षाच्या कामाबद्दल नांदेडच्या दौऱ्यावर असताना माझ्याच कार्यक्रमात ललकार बाबू यांनी वामनदादाचे मला सुद्धा फार माहीत नसलेले गीत गायले आणि माझी उत्सुकता जाणवली. कारण या गीतातून अमेरिकेतील आर्थिक भांडवलशाही, डंकेल ड्राफ्ट, डब्ल्यूटीओच्या माध्यमातून, वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून जगावरती कसा कब्जा करीत असून, लहान लहान राष्ट्रांना आर्थिकदृष्टया गुलाम करून अमेरिकन साम्राज्यशाही कशी जगभर वाढत आहे याचे दर्शन घडत होते. वामनदादा या गीताद्वारे लिहितात ,
”जिनके पास करोडो अब्जो रुपयोंकी राशि है ।
वही तो भारत के गले की फासी है ।
वर्ल्ड बँक कर्जा देती है ।
लेकिन दाम दुगुना लेती है ।
कौन कहता है वह दुनिया की रखवाली है ।
वह तो अमेरिका की साली और डंकेल की घरवाली है ।”

Reviews
There are no reviews yet.