Description
महावीर जोंधळे यांची कविता मानवी सुरूपतेचा पुरस्कार करणारी आहे. म्हणूनच स्त्रीच्या विविध रूपांचा, मातृत्वाचा, मातृरूपाचा, प्रेमबंधाचा, भावनिक ओढीचा आसक्तमुक्त उद्गति व्यक्त करते. कडवटपणा, प्रक्षुब्धता, घृणास्पदता व लैंगिकता यांपासून हि कविता दूर आहे. निसर्गवर्णन करणारी हि कविता नाही तर निसर्गाचे मानवी संवेदन ती प्रगट करते. मानवी वृत्ती-प्रवृतींचाही ती वेध घेते. कधी अलिप्तपणे तर कधी उपरोधिकतेने. तद्ववच ती कृत्रिम भावविश्वात रमत नाही कि अकारण तात्विकतेच्या अरण्यात प्रवेश करत नाही. रंजनाचा तिला सोस नाही. जीवनमूल्यांचा ध्यास हीच महावीर जोंधळे यांच्या कवितेची प्रकृती आहे.
Reviews
There are no reviews yet.