हिरवं सपान

90.00

5 in stock

पुस्तकाचे नाव हिरवं सपान
लेखक सुवर्णा दिलीप लोंढे
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ७२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ९२ ग्रॅम

Description

महाराष्ट्राच्या मातीला दुष्काळ ही काही नवीन समस्या नाही पण त्यावर मात करत भौगोलिक परिस्थितीशी झुंजत दोन हात करण्याचं बळ मात्र अनेक अनेक भागात पहायला भेटते. गाव पाणीदार करण्यासाठी अनेक चळवळी आजही राज्यभरात सुरू आहेत. तशीच एक क्रांतिकारी चळवळ पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार या गावी मे 2020 ला पार पडली.  या मोहिमेत सहभाग घेतलेल्या युवकांचे योगदान, त्यांची स्फूर्ती, एकता, चळवळीचं आणि चळवळी नंतरचा हिरवागार शिवार व त्याचा समाज व्यवस्थेवर झालेला परिणाम याचं  अचूक वर्णन आपल्याला  ‘हिरवं सपान’ या काव्यसंग्रहात पाहायला मिळतं.

‘ हिरवं सपान’ हा कवितासंग्रह ग्रामीण कवितेचे शेतकरी जीवनाशी असलेले संबंध, शेतकऱ्यांच्या  व्यथा, वेदनांनी आपल्याला अंतर्मुख करणारी अस्सल ग्रामीण कविता या बाजू विशेष अधोरेखित करतो.  बदलती ग्रामीण संस्कृती व जनजीवन यांचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाला हा काव्यसंग्रह नक्की उपयोगी पडेल.  नव्या जुन्या ग्रामीण भाषेतील शब्दांची अचूक मोट बांधून विणलेला हा काव्यसंग्रह निश्चित सर्व रसिकजनांना आवडेल यात  तिळमात्र शंका नाही.  त्यांचा हा दुसरा काव्यसंग्रह साहित्य क्षेत्रात नक्कीच एक वेगळा  ठसा उमटवेल. कवयित्री सौ. सुवर्णा लोंढे यांना भविष्यातील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा !

 

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “हिरवं सपान”

Your email address will not be published. Required fields are marked *