गरम झळा आणि संभ्रमाची फळे

90.00

1 in stock

पुस्तकाचे नाव गरम झळा आणि संभ्रमाची फळे
लेखक पोपट सातपुते
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १२०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ८० ग्रॅम

Description

पोपट सातपुते गेली सुमारे पंचवीस वर्षे कविता लिहित आहेत. त्यांची कविता हां समकालीन मराठी कवितेतला विशिष्ट एकाकी आशयघन स्वर म्हणता येईल. कारण या प्रकारची कविता आणखी कोणीही कोणीही लिहिताना दिसत नाही. आधी कोणी लिहिल्याचेही मला माहीत नाही. जोडायचेच ठरले तर एकीकडे या कवितेचे नाते मराठी भाषा जन्मण्याआधीच्या प्राकृत गाथासप्तशतीतल्या गाथांमधल्या नाजुकतेशी आहे आणि दुसरीकडे तिला टागोरांच्या कवितेतल्या गूढ़तेशी, दार्शनिकतेशी, आध्यात्मिक आशय संपन्नतेशी जोड़ता येईल. ग्रामजीवन व त्यापेक्षाही त्यापल्याडच्या रानातला निसर्ग आणि एकांडा माणूस यांच्यातल्या नात्यांची अल्पाक्षरी चित्रे रेखाटताना या प्रकारचे दुपेड़ी प्रभाव क्षेत्र त्यांनी अंगभूतपणे निवडलेले दिसते. सभोवतीच्या दुनियेच्या संदर्भात आत्मशोध घेतानाही याच प्रभावक्षेत्राचा पट त्यांना सोयीस्कर वाटलेला आहे. दीर्घकाल सातत्याने, स्व;ताच्या लयीशी संवेदक इमान राखित इतकी आशय संपन्न कविता लिहिणारा या प्रकारचा दूसरा कवी नाहीय, इतकी त्यांची कविता वेगळी आहे. 

त्यांच्या अलीकडच्या काही कवितात सामाजिक आशय चांगल्या ताकदीने डोकावतो. तरीही ते त्यांच्या कवितेचे बलस्थान म्हणता यायचे नाही. अपवादात्मक तरलता, गूढता, चित्रात्मकता व आध्यात्मिकता ही त्यांच्या कवितेची काही वैशिष्ट्ये म्हणता येतील. ती महत्त्वाची अशीच आहेत. वरवर सोप्या दार्शनिक भाष्यांसारखी वाटणारी ही कविता आपण सहजी ओलांडून पुढे जाऊ शकत नाही. वाचावे तिथे घोटाळत मुख्यार्थ, ध्वन्यार्थाच्या गोफात गुरफटत काहीतरी घेऊन उठल्याखेरीज पुढचा रस्ता दिसत नाही. जगण्यातल्या ओलसर जिव्हाळ्याची मंद धून शांतपणे वाजवत राहणारी ही कविता म्हणूनच फार फार महत्त्वाची आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गरम झळा आणि संभ्रमाची फळे”

Your email address will not be published. Required fields are marked *