Description
असे म्हणतात की सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी कोणातरी व्यक्तीला वाटले की आपण मेंदूचा अभ्यास केला पाहिजे. असे त्या व्यक्तीला का वाटले याचे कारण जरी सांगता आले नाही, तरी तेव्हापासून अभ्यासाला सुरवाता झाली आणि त्या घटनेने चालना दिल्यामुळे आजही अनेक लोक अनेक प्रयोगशाळांमधून मेंदूचा अभ्यास करण्यात काळ व्यतीत करत आहेत. रहस्याचा भेद करता करता जी रहस्य समोर आली आहेत, त्यामुळे कुतूहलाला अधिकच खाद्य मिळून अधिक उत्साहात व जोमाने हे कार्य चालू आहे. नवी नवी तंत्रज्ञाने माणसाला काहीतरी देण्यासाठी विकसित केली जात आहेत. मेंदूचा अभ्यास पुढे चालूच राहील असे आज आपण म्हणू शकतो. मेंदूचा अभ्यास करणे, तो समजावून घेणे हे अवघड आहे. या संदर्भात आपल्या मनात काही प्रश्न उभे राहतात. त्यातील काही असे:
- मेंदू मेंदूला समजावून घेऊ शकेल का ?
- त्याला मन म्हणजे काय ते समजेल ?
- त्याला प्रचंड संगणक म्हणता येईल की एक अत्यंत आधुनिक यंत्र ?
- तो एक प्रगल्भा प्रक्रियक आहे की निर्णायक नियंत्रक आहे ?
- का काही वेगळीच गोष्ट आहे ? अनाकलनीय, अजुन बऱ्याच प्रमाणात अज्ञात असलेली रहस्यमय गूढ गोष्ट !

Reviews
There are no reviews yet.