निवडक जैवशास्त्रज्ञ

50.00

1 in stock

पुस्तकाचे नाव निवडक जैवशास्त्रज्ञ
लेखक जयंत खंदारे
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १०६
आकार ४.५ * ७ इंच
वजन ४९ ग्रॅम

Description

शास्त्रज्ञांचं जीवन गूढ असल्याचं मानलं जातं, कदाचित ते खरेही असेल. असं म्हणतात की, ” एक बंडखोर समाजात क्रांती घडवून आणू शकतो” शास्त्रज्ञही असतात असेच बंडखोर… विज्ञानाच्या निखळ आवडीमुळे सतत झटणारे, नवनवीन संकल्पना, निरीक्षणे, प्रयोग यांवर सिद्धांत मांडणारे… नेहमीच प्रवाहाविरुद्ध पोहणारे, प्रत्येक अपयशाला यशाची पायरी मानणारे, स्वत:ची स्वप्नं साकार करण्यासाठी अथक परिश्रम करणारे अन प्रसंगी स्वत:चे घरदार व देशही सोडणारे हे शास्त्रज्ञ म्हणजे विरळाच… आणि म्हणूनच जनसामान्यांच्या हृदयात शास्त्रज्ञांना मोलाचे स्थान आहे. संशोधनाच्या इतिहासात एरिस्टोटल, कोपर्निकस, गैलिलिओ, न्यूटन, आईन्स्टाईन इत्यादी व्यक्तींची नावे सुवर्णाक्षरांत कोरली गेली आहेत.

विज्ञानात उच्च दर्जाचे किंवा कमी दर्जाचे संशोधन मानण्याचे काही कारण नसते. प्रत्येक नवीन संशोधन मोलाचे असू शकते. माझ्या मते काही शोधांमुळे मानवाने मैलाचा दगड पार केला आहे. उदाहरणच द्यायचे झाल्यास डॉ. एडवर्ड जेन्नर यांनी विषाणूंच्या सखोल माहिती शिवाय अथक प्रयत्नानंतर देवीची लस निर्माण केली, तेथूनच मानवाने खऱ्या अर्थाने आजारावर जय मिळवण्यास सुरुवात केली.  या पुस्तकात महान संशोधकांची खरी ओळख सहज व सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे निवडक जैवशास्त्रज्ञ हे पुस्तक लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना प्रोत्साहन देत राहील.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “निवडक जैवशास्त्रज्ञ”

Your email address will not be published. Required fields are marked *