Description
वाचक मित्रांनो शास्त्रज्ञांच्या चरित्रकथा का वाचायच्या व कशासाठी ? हेच प्रश्न अनेकांना पड़त गेले. न्यूटनला प्रश्न पडला, सफरचंद खाली का पडते. कोपर्निकसला प्रश्न पडले. ग्रह, तारे ऐसे का फिरताहेत ? एडिसनला प्रश्न पडला गाणे परत परत का ऐकता येणार नाही ? दिवा परत परत का वापरता येणार नाही ? गटेनबर्ग ला प्रश्न पडला परत परत वापरण्याजोगा टाईप का करता येऊ नये ? व्हेर्नर ब्रॉनला प्रश्न पडला अग्निबाण वापरून चंद्रावर जाता येईल का ?
मित्रांनो अशा शेकडो मंडळींना नुसतेच प्रश्न पडले नाहीत, तर या प्रश्नांची उत्तरे शोधण्याकरीता अनेकाना आपले आयुष्य खर्ची घालावे लागले. कित्येकांना समकालीन लोकांनी त्रास दिला. गॅलिलीओला तर मारण्याचा हुकूम देण्यात आला. अशा अनेक संशोधकांनी संकटांचा यशस्वीपणे, चिकाटीने सामना केला आणि जगाच्या इतिहासात यांची नावे अजरामर झाली. या संशोधकांच्या चरित्रवाचनातून आपण थोडीफार स्फूर्ती घ्यावी व आपले विचारचक्र चालू ठेवावे यासाठी शास्त्रज्ञांचे चरित्र वाचन अत्यंत जरूरीचे आहे.

Reviews
There are no reviews yet.