Description
जीवनविद्येचे शिल्पकार सदगुरू श्री. वामनराव पै, सेवानिवृत्त डेप्युटी सेक्रेटरी, फायनान्स डिपार्टमेंट, मंत्रालय, मुंबई हे सन 1952 पासून सातत्याने व निरपेक्षपणे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथ निर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादी द्वारा समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहेत.
घरात आलेल्या सुनांची किंमत सोन्यात करायची नसते तर त्यांच्या रुपाने लक्ष्मीच सोन्याच्या पाऊलाने घरात प्रवेश करते हे ओळखायचे असते.
स्त्रियांनी घरातील इतर स्त्रियांचा मान राखला, सन्मान केला, प्रसंगी एकमेकांचे कौतुक केले व एकमेकींना चांगली वागणूक दिली, तर त्या सत्कर्मातून पुण्य निर्माण होऊन तेच पुण्य बूमरँग होऊन सुखी जीवनाच्या स्वरूपात त्यांच्याकडे परत येईल. हे सर्व घडते ते निसर्ग नियमांप्रमाणे येथे कर्मकांड उपयोगी पडत नाही, उपयोगी पड़ते ते कर्मचांग !
जीवनविद्या ‘चूल व मूल’ हां विषय अत्यंत महत्त्वाचा मानते. उत्तम चूल सांभाळण्यासाठी स्त्रियांना पाक शास्त्र, आहार शास्त्र व आरोग्य शास्त्र या तीन महत्त्वाच्या शास्त्रांचे ज्ञान व मूल सांभाळण्यासाठी मुलांचे मानस शास्त्र व शरीर शास्त्र या शास्त्रांचे ज्ञान अवगत असणे आवश्यक आहे. ‘चूल व मूल’ हा विषय प्रत्यक्षात कुटुंबाचा खांब, समाजाचा कना व राष्ट्राचा पाया आहे म्हणून कुटुंब व्यवस्था मजबूत करण्याकडे सर्वांनी लक्सा दिले पाहिजे

Reviews
There are no reviews yet.