Description
थोर माणूस इतिहास घडवतो हां सिद्धांत तुम्ही स्वीकारा अथवा स्वीकारु नका. तुम्हाला एवढे मान्य करावेच लागेल की प्रत्येक देशात बुद्धिवादी लोक, सत्ताधारी वर्ग नसला तरी, प्रभावशाली वर्ग असतो. बुद्धिवादी वर्गास दूरदृष्टी असते, तो सल्ला देऊ शकणारा आणि पुढाकार घेणारा वर्ग असतो. कुठल्याही देशात सामान्य जनसमुदाय स्वबुद्धियुक्त विचार आणि कृती असलेले जीवन जगत नाही. तो बहुतांशी अनुकरण करणारा असून बुद्धिवादी वर्गाचे अनुकरण करतो. देशाचे भवितव्य सर्वस्वी बुद्धिवादी वर्गावर अवलंबून असते ऐसे म्हणण्यात अतिशयोक्ति नाही. हां वर्ग प्रामाणिक, स्वतंत्र आणि निर्लोभी असेल तर संकटसमयी पुढाकार घेवून तो योग्य दिशा देईल ऐसा भरवसा त्याच्यावर ठेवता येऊ शकतो. बुद्धि हा स्वायत्त सद्गुण नाही हे खरे आहे. ती केवळ साधनमात्र आहे आणि साधनांचा उपयोग बुद्धिवादी व्यक्ति कोणत्या हेतुसाठी करते त्यावर अवलंबून असतो.
Reviews
There are no reviews yet.