Description
शेती हा आपल्या देशातील 70% लोकांचा व्यवसाय आहे. खेड्यातील लोकांचे तर हेच उपजीविकेचे एकमेव साधन आहे. शेतीची भरभराट झाली तर खेड्यात राहणाऱ्यांचे आणि शेतीशी निगडीत उद्योगधंद्यात काम कारणाऱ्यांचे जीवनमान सुधारेल. शेतीची भरभराट ही संशोधनावर आधारलेल्या आधुनिकीकरणावर अवलंबून आहे. आज कृषिशास्त्र इंग्रजी भाषेत माध्यमातून शिकविले जाते. त्यामुळे ह्या विषयातील संशोधन फलितेही इंग्रजी भाषेत तयार होतात. शेतीच्या विकासासाठी आवश्यक असे ज्ञानभांडार इंग्रजी भाषेत आहे. पण ज्यांच्यासाठी हे ज्ञानभांडार निर्माण केले जाते त्या लोकांची मायबोली महाराष्ट्रात मराठी आहे. त्यामुळे शेतीविषयक आधुनिक संशोधन मराठी भाषेत होणे आवश्यक आहे.
हा शब्दकोश करताना इंग्रजी शब्दांचा भावार्थ पर्यायी मराठी शब्दांत आणणे आवश्यक होते. तसेच, कृषिशास्त्र हे व्यावहारिकदृष्ट्या महत्त्वाचे शास्त्र असल्यामुळे व्यवहारात प्रचलित असलेल्या मराठी रूढ़ शब्दांचाही विचार करणे आवश्यक होते.
Reviews
There are no reviews yet.