Description
”वक्तृत्व ही एक कला आहे. ती अवगत होण्यासाठी अविरत श्रम केले पाहिजेत. मी देखील प्रथमत: भेदरट होतो. एलफिस्टन कॉलेजमध्ये मी जेव्हा प्रोफेसर होतो त्यावेळी विद्यार्थ्यांपुढे भाषण करताना माझे मन द्विधा होई. उच्चवर्णीयांपुढे महाराचा पोरगा बोलताना त्याची टिंगल होईल, अशी भीती मला वाटत असे. मी वादविवाद मंडळामध्ये फारसा भाग घेतला नाही. मी चांगला बोलू शकेन असे त्यावेळी मला मला वाटत नसे. मी इंग्रजी भाषा चांगल्या तऱ्हेने लिहितो, निदान माझे मला तरी त्यावेळी वाटत असे. मी फार पराकाष्ठेचे प्रयत्न याबाबतीत केले आहेत. 12-13 वेळा मी माझे भाषण लिहून काढले आहे. यापेक्षा कोणालाही काही अधिक सांगता येणार नाही, अशी जेव्हा माझ्या मनाची पक्की खात्री होई, तेव्हाच मी भाषण करीत असे. आज थोड़े जे काही मी बोलू शकतो, ते पूर्वपरिश्रमाने अवगत केलेल्या ज्ञानामुळेच बोलतो.”

Reviews
There are no reviews yet.