Description
राहुल सांकृत्यायन यांच्या ‘वैज्ञानिक भौतिकवाद’ या हिंदी पुस्तकाचा डॉ. विजय भगत यांनी केलेला हा मराठी अनुवाद त्यांनी आवड म्हणून न करता सांस्कृतिक व्यवहाराची गरज आणि मार्क्सवादाच्या देशीकरणाचे प्रात्यक्षिक अशा दुहेरी हेतूने केलेला आहे. कदाचित यामुळे मार्क्सवादी बौद्धिक जगात द्वंद्वात्मक भौतिकवाद (Dialectical Materialism), ऐतिहासिक भौतिकवाद (Historical Materialism) आणि ‘वैज्ञानिक भौतिकवाद’ (Scientific Materialism) हा क्रम अधिक स्पष्ट होईल. ब्रह्मतत्त्वाचे काय करायचे ? या प्रश्नाचे उत्तर सांकृत्यायन यांनी या पुस्तकात दिलेले असल्यामुळे अनुवादाच्या पाठीमागे हा सुद्धा हेतु असण्याची शक्यता आहे.
कार्य-कारण (हेतुवाद), अंधश्रद्धा, भूत आणि द्वंद्ववाद अशा तीन भागात विभागलेल्या ह्या पुस्तकाचा अत्यंत प्रवाही आणि सांकृत्यायन यांच्या मूळ विश्वातील विचारवलयांना समांतरपणे घेऊन जाणारा हा अनुवाद आहे. त्यातील ‘अनुवादीय तरलता’ वाचन करताना ध्यानात आल्यावाचून राहणार नाही. सांकृत्यायन ह्यांच्या विचारविश्वातील चतुष्ट्यापैकी हे एक महत्त्वाचे पुस्तक अनुवादित झाल्यामुळे बौद्ध तत्त्वज्ञान आणि मार्क्सवाद यातील समन्वयाची गरज, या संदर्भाने आवश्यक असणारे स्पष्टीकरण यांची गरज अधिक सुलभ आणि पारदर्शक आहे.

Reviews
There are no reviews yet.