Description
स्वातंत्र्य सैनिक म्हणजे केवळ ज्यांनी तुरुंगवास भोगला आहे. अशी व्याख्या न करता स्वातंत्र्य संग्रामामध्ये या ना त्या स्वरूपात ज्यांनी भाग घेतला आहे व ज्यांच्या कुठल्याना कुठल्या प्रकारे सहभाग होता, ज्यांना हाल सोसावे लागले तो स्वातंत्र्य सैनिक अशी व्याख्या करून त्यांचा समावेश या चरित्रकोशात करून तो प्रकाशित करण्यात आला. यासाठी उपयोगात आलेली कार्यपद्धती व त्यानिमित्ताने स्वातंत्र्य आंदोलनाचा धावता आढावा ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये तत्कालीन संपादक, डॉ. भ. ग. कुंटे यांनी घेतला यांनी घेतला आहे.
1857 च्या वेळी या भागात मिळालेला प्रतिसाद पुढे निजामी सत्तेविरुद्ध आर्य समाजाने केलेला प्रदीर्घ संघर्ष भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाला साथ देण्यासाठी खिलाफत चळवळ, वंदे मातरम आंदोलन, जंगल सत्याग्रह किंवा 1942 चा ” चले जाव ” लढा त्यांना साथ देण्याचा झालेला प्रयत्न व त्यातूनच स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्त्वाखाली हैदराबाद कॉंग्रेसने केलेला लढा त्या सर्वांचा थोडक्यात आढावा ग्रंथाच्या मूळ प्रस्तावनेत डॉ. भ. ग. कुंटे यांनी घेतला आहे.
Reviews
There are no reviews yet.