Description
या विश्र्वाचा आरंभ कसा झाला?
या विश्र्वाला अंत आहे की ते अंतहीन आहे?
या विश्र्वाला सीमा आहे की नाही ?
या अवकाशात तीन सोडून आणखी किती मिती आहेत ?
या काळाच्या प्रवाहाला एकच दिशा का आहे ?
यांसारख्या आणि इतर अनेक मन भारून टाकणाऱ्या रहस्यांचा शोध सर्वांना समजेल आशा सोप्या भाषेत या शतकातील सर्वात विलक्षण बुद्धिमान शास्त्रद्न्य डॉ. स्टीफन डब्ल्यू, हॉकिंग यांनी घेतला आहे. हॉकिंग वाचकाचे बोट धरून त्याला अवकाश – काळ, कृष्णविवर, क्वार्क, प्रतिद्रव्य आणि काळाचा बाण, महास्फोट यांच्या अनोख्या विश्र्वात फिरवून आणत असताना वाचकाचे कुतूहल शमते. त्याच्या बुद्धीला आव्हान मिळते आणि विश्व निर्मितीच्या मागील रहस्यांचे सम्यक दर्शन होते.
महास्फोट आणि विश्र्वाचा आरंभ या गहन विषयांची सूत्रबद्ध आणि विचार प्रचुर मांडणी आईंस्टाइनने हॉकिंग इतक्या प्रभावीपणे दुसऱ्या कोणी क्वचितच केली असेल. खुद्द आईंस्टाइनने जर सामान्य वाचकांसाठी पुस्तक लिहायला घेतले असते तर कदाचित ते असेच झाले असते असा विचार वाचकांच्या मनात आल्यावाचून राहणार नाही.
– न्यूज डे
एका चांगल्या शिक्षकाकडे असायला हवे त्या सर्व गुणांची नैसर्गिक देणगीच स्टीफन हॉकिंगना लाभली आहे. सहजसोपी शैली, कठीण विषय सोपा करून सांगण्याची हाटोती, नर्म विनोदाची पखरण आणि जागोजागी परलेली रोजच्या आयुष्यातील उदाहरणे.
– न्यूयॉर्क टाइम्स
हॉकिंग त्यांच्या चाकांच्या खुर्चीत असहायपणे बसलेले असले तरी त्यांच्या तल्लख बुद्धीची झेप अवकाश – काळाचा प्रचंड विस्तार ओलांडून या विश्वाच्या रहस्यांची उकल करण्यात गुंतलेली असते.
– टाइम्स
Reviews
There are no reviews yet.