Description
संविधान म्हणजे कायद्यांचा कायदा ! देशाचे सर्वोच्च दस्तऐवज ! राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचा आणि लोकशाहीचा आधारस्तंभ ! भारत एक राष्ट्र म्हणून कसे असायला हवे, भारताच्या नागरिकांनी कसे वर्तन करायला हवे, देशाचे संरक्षण आणि संवर्धन करताना संसद, कार्यपालिका, न्यायपालिका यांनी कोणती भूमिका निभावली पाहिजे, याबाबतचे मार्गदर्शन म्हणजे भारताचे संविधान होय. अशा या संविधानाची अतिशय सोप्या पद्धतीने तोंडओळख करून देण्याचे काम ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा यांच्या या छोट्या पुस्तिकेने केले आहे. संविधानाची पार्श्वभूमी जगात आदर्श ठरलेला संविधानाचा सरनामा, देशाने स्वीकारलेले धर्मनिरपेक्ष समाजवादी गणराज्याचे स्वरूप, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये अशा सगळ्यांचा उहापोह या पुस्तिकेत करण्यात आला आहे. त्यामुळेच संविधान समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी ही पुस्तिका निश्चितपणे मार्गदर्शक ठरणार आहे.

Reviews
There are no reviews yet.