गुगल : कथा माहितीच्या अजस्त्र कारखान्याची

135.00

1 in stock

पुस्तकाचे नाव गुगल : कथा माहितीच्या अजस्त्र कारखान्याची
लेखक अतुल कहाते
ISBN 978-93-86118-96-7
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १३७
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १४० ग्रॅम

Description

गुगल‘ हा शब्द पहिल्यांदा ऐकायला विचित्र वाटतो.  पण अलीकडे हा विचित्र शब्द न ऐकलेला साक्षर मध्यमवर्गीय माणूस सापडण कठीण आहे.  तरुणांचं तर पानसुद्धा गुगलशिवाय हालत नाही, आता तर चक्क शब्दकोशामध्ये ‘गुगल’ हा शब्द क्रियापद म्हणून अधिकृतरीत्या समाविष्ट करण्यात आला आहे.  त्यामुळे ‘मी माहिती शोधली’ याला लोक सरळ ‘I googled’ असं इंग्रजीमध्ये म्हणतात ! एका दशकाहून थोडा जास्त काळ अस्तित्वात असलेल्या आणि स्टॅन्फर्डमधल्या दोन विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या या कंपनीचा प्रवास अत्यंत रंजक आणि अविश्वनीय आहे. त्यातून लोकांना पडत असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरसुद्धा मिळतील.  त्यातले नमुन्यादाखल काही प्रश्न असे :

  • गुगलचे निर्माते कोण आणि कुठले आहेत ?
  • गुगल कंपनीला पैसे कुठून मिळतात ?
  • गुगलचं सर्च इंजिन सर्वोत्तम का मानलं जातं ?
  • जीमेल, यूट्यूब , एंड्रॉइड हे सगळं कुठून आलं ?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारं, गुगलच्या प्रवासाचा आलेख रेखाटणारं आणि त्याची सक्सेस स्टोरी सांगणारं हे पुस्तक आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गुगल : कथा माहितीच्या अजस्त्र कारखान्याची”

Your email address will not be published. Required fields are marked *