भीमा तुझ्या जन्मामुळे…

45.00

1 in stock

पुस्तकाचे नाव भीमा तुझ्या जन्मामुळे…
लेखक वामनदादा कर्डक
ISBN 978-93-94925-73-1
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ६४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ८० ग्रॅम

Description

आंबेडकरी प्रबोधन कार्याचा भाग म्हणून महाराष्ट्राच्या विविध भागात धम्मपरिषदा आणि सामाजिक कार्यक्रमांत प्रबोधन साहित्याच्या स्टॉलवर ग्रामीण भागातील आंबेडकर अनुयायी वामनदादांच्या गीतसंग्रहाची मागणी हमखास करतात. आजही वामनदादांची आणि इतर भीम शाहीरांची गीते गाणारी भजनी मंडळे, गायन पार्ट्या गावागावांमध्ये आंबेडकरी विचार रुजविण्याचे कार्य करीत आहेत.

आंबेडकरी चळवळीतील जनप्रबोधनाच्या कार्यातील लोकशाहीरांचे, गीतकारांचे, भजनी मंडळाचे योगदान सर्वविदित, सर्वमान्य आणि अत्यंत स्पृहणीय आहे. ज्यावेळी धम्म चळवळ चालविण्यासाठी भिक्खू संघ आणि भिक्खू नव्हते; त्या काळामध्ये बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन हे शाहीर, गायक आणि भजनी मंडळे बुद्धविचाराची, धम्माची रुजवन गावोगावच्या बौद्ध समाजात आपल्या परीने करीत होती. रिपब्लिकन चळवळ विखंडित होताना समाजाला ऐक्याचा सन्देश देत, अन्यायाविरुद्ध उभे राहण्यास प्रेरित करीत होती. या शाहीरांचे, गीत-गायकांचे आणि भजनी मंडळांचे कार्य असे आंबेडकर चळवळीसाठी, बुद्धधम्म चळवळीसाठी पायाभरणीचे कार्य आहे. ते आजही आवश्यक आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भीमा तुझ्या जन्मामुळे…”

Your email address will not be published. Required fields are marked *