Description
सजीवाचे मूळ धूमकेतू
आपल्या सर्वांचे आकाशाशी एक अतूट नाते आहे. कारण आपल्याभोवती असलेले सर्व सजीव आणि निर्जीव ज्या सूक्ष्मकणांनी (अणुंनी) तयार झाले आहेत ते सर्व आकाशातून आले आहेत. पृथ्वी निर्माण व्हायच्या अगोदर याच सूक्ष्मकणांनी एकमेकांच्या सहकार्याने ग्रहांची निर्मिती केली आणि त्याही अगोदर हेच सूक्ष्मकण तारकांदरम्यानच्या पोकळीत वायु व इतर कणांच्या स्वरूपात तरंगत होते. पृथ्वी पूर्णपणे निर्माण झाल्यानंतर अवकाशातील विशेषत: धूमकेतुतील सर्व वस्तुमान पृथ्वीच्या पृष्ठभागावर जमा झाले. तिच्यावरील सजीवांचे बीज धूमकेतूनच आणले. म्हणूनच आपण सर्वजण धूमकेतुची लेकरे आहोत.

Reviews
There are no reviews yet.