Description
भारताला विवेकवादी बौद्ध विचारवंतांची फार मोठी परंपरा आहे. त्यांनी बौद्ध विचारांची अखंडपणे समर्पित सेवा केली. यामुळे जगाच्या इतिहासामध्ये आधुनिक बौद्ध विद्वानांची चिरंतन नोंद राहील. कारण त्यांनी बौद्ध वाङ्मय निर्मितीलाच जीवनाचे मूल्य समजले. यातील काही विचारवंतांच्या जीवनावर मराठी भाषेत वाङ्मय उपलब्ध आहे.
बौद्ध दर्शनाची गंभीरता, व्यापकता आणि बहु आयामिता, बौद्ध संस्कृतीचा विस्तार आणि अवांतर अनेकता तसेच बौद्ध वाङ्मयाच्या विपुलतेस बघता आधुनिक बौद्ध विचारवंतांच्या योगदानावर संक्षिप्त विचार करणे एका निबंधामध्ये शक्य नाही. कारण त्यांचा विषय एवढा व्यापक शोध होऊ शकेल. समाजनिष्ठ जीवन आशयाशी संबंधित असलेल्या विचारवंतांच्या लेखनाचा, जीवनाचा आढावा या लेखनकार्यासाठी घेतला आहे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- देवमित्त अनागरिक धर्मपाल
- प्रा. पी. लक्ष्मी नरसू
- आचार्य धर्मानंद कोसंबी
- त्रिपिटकाचार्य राहुल सांकृत्यायन
- डॉ. भदन्त आनंद कौसल्यायन
- भिक्खू जगदीश काश्यप
- डॉ. भिक्खू धर्मरक्षित

Reviews
There are no reviews yet.