Description
३० सप्टेंबर १९९३ ची पहाट डोळ्यांसमोर उभी राहिली. ती गणपती विसर्जनाची रात्र होती. जिकडे नजर जाईल तिकडे भग्नावशेष, ढिगाऱ्याखाली दबलेली माणसं, करुण आक्रोश आणि हाहाकार दिसत होता. अनेक कुटुंबे एका क्षणात उद्ध्वस्त झाली होती. निराधार झालेल्या मुलांचे भयभीत डोळे पाहताना मन सुन्न होत होते. त्या क्षणी जाणवलं, केवळ शासनाची यंत्रणा पुरेशी नाही; तर संपूर्ण समाजाने एकत्र उभे राहणे आवश्यक आहे. आज या मुलांचा प्रवास पाहताना मन अभिमानाने भरून येते. कुणी शास्त्रज्ञ झाले; कुणी इतिहासाचे अभ्यासक झाले; कुणी महसूल, पोलिस, कृषी विभागात अधिकारी झाले, तर कुणी उद्योग- व्यवसाय, बॅंकिंग, कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळविले. काहींनी तर भारतीय लष्करात भर्ती होऊन देशसेवा सुरू केली. एका क्षणात उद्ध्वस्त झालेल्या या आयुष्यांनी आज संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशाचा लौकिक वाढवला आहे. ही यशोगाथा वाचताना मन पुन्हा त्या दिवसांकडे जाते; परंतु त्याचबरोबर यातून उभ्या राहिलेल्या मानवी जिद्दीचे, सहकार्याचे आणि संवेदनशीलतेचे चित्रही समोर येते. संकटाच्या वेळी समाज एकत्र येऊन काय कारु शकतो, याचे हे विलक्षण उदाहरण आहे. ‘किल्लारी भूकंपातील फिनिक्स’ हे पुस्तक केवळ भूतकाळाची नोंद नाही, तर भविष्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन आहे. ही कथा वाचताना प्रत्येकाला आपत्तीच्या वेळी संवेदनशील उभे राहण्याची प्रेरणा मिळेल.

Reviews
There are no reviews yet.