Description
गेल्या ५०-६० वर्षांतील विशेषकरून १९४० ते १९८०-९० पर्यंतच्या काळातील निवडक साहित्यिकांचा परिचय करून देणारी ही पुस्तकमालिका. ह्या साहित्यिकांची ओळख करून देताना त्यावेळचा आपला मराठी समाज, १९४२ ची ‘चले जाव’ चळवळ, स्वातंत्र्यलढा, १९४७ चे भारताला मिळालेले स्वातंत्र्य, त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ आशा ऐतिहासिक ठळक घटना आपल्यासमोर ओघाने येतात. तसेच मराठी साहित्यातील नवे प्रवाह; नवकविता, नवकथा, वैचारिक वाङ्मय, विनोदप्रधान साहित्य, वंचितांची अभिव्यक्ती असलेले साहित्य असे विविध प्रवाहदेखील आपल्याला ह्या पुस्तकांतून दिसतात.
परिचयात्मक अशी ही पुस्तके आहेत. त्यांच्या साहित्याची समीक्षा नाही किंवा केवळ त्या साहित्यिकांचे चरित्र नाही. त्यांच्या साहित्याचा हा परिचय आहे. तसेच ह्या लेखकांनी लिहिलेले साहित्यही संक्षिप्तपणे ओळख होण्यासाठी यामध्ये समाविष्ट केले आहे.
पारिजातकाचे फूल पाहताक्षणी आपल्याला मोहवून टाकते. तशी शब्दकळा मंगेश पाडगावकरांची आहे. कवितेतली प्रत्येक ओळख मोहक, आकर्षक त्या ओळीतून जणू सुगंध येतोय ऐसे वाटावे. असा सुगंध उधळीत पाडगावकर आपल्याला आनंदाने जगण्याचे भान देतात.

Reviews
There are no reviews yet.