दिग्गज २

500.00

1 in stock

पुस्तकाचे नाव दिग्गज २
लेखक दीपा देशमुख
ISBN 978-93-6374-598-8
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ३८०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ४६० ग्रॅम

Description

‘दिग्गज’ हे पुस्तक सर्व वयोगटातल्या वाचकांसाठी असून जगाला नवी दिशा देणाऱ्या ६० हून अधिक असामान्य व्यक्तींच्या जीवनात डोकावण्याची संधी यामुळे वाचकाला मिळणार आहे. या नभोमंडलात जसे अगणित तारे लुकलुकतात, त्या सगळ्यांची संख्या मोजण अशक्य आहे; त्याचप्रमाणे या जगात अशी काही माणसं आहेत आणि होऊन गेलीत, ज्यांचं कार्य या तेजोमय ताऱ्यांसारखंच आहे. त्यांच्या कल्पनांनी आणि योगदानाच्या प्रकाशानं हे जग अनेक युगं उजळून निघालं आहे. अशा या व्यक्तींनी आपल्या अद्वितीय कौशल्याने आणि समर्पित वृत्तीने इतिहासाच्या पानावर आपली अमिट छाप सोडली आहे ! दिग्गज या पुस्तकातून साहित्य, कला, विज्ञान, गणित, स्थापत्य, चित्र, शिल्पकला, संगीत, समाजकारण आणि राजकारण यांसारख्या विविध क्षेत्रांतल्या प्रतिभासंपन्न व्यक्तींच्या कार्याचा आणि जीवनाचा अद्भुत प्रवास वाचकाला घडणार आहे.

या पुस्तकातलं प्रत्येक पान वाचकाला या प्रेरणादायी दीपस्तंभाच्या अथक परिश्रमांची, ध्येयाची आणि समाजासाठी काहीतरी भरीव करण्याच्या तीव्र इच्छाशक्तीची ओळख करून देईल. त्यांच्या कल्पनांनी, प्रयत्नांनी आणि परिश्रमांनी हे जग कसं बदललं; त्यांच्या शोधांनी मानवी जीवनाला एक नवी उंची काशी दिली आणि त्यांच्या कलेने आपल्या मनात कसा आनंद निर्माण केला; हे सारं वाचकाला दिग्गज मध्ये वाचायला मिळेल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “दिग्गज २”

Your email address will not be published. Required fields are marked *