Description
महाराष्ट्रातील आदिवासी जमाती हा आदिवासी जमातींची सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख करून देणारा मराठी भाषेतील महत्त्वाचा ग्रंथ. महाराष्ट्र राज्यातील 47 आदिवासी जमातींची ओळख या ग्रंथात लेखकाने विस्ताराने करून दिली आहे. त्या सोबत आदिवासी प्रदेश, आदिवासी विकासाच्या योजना बदलते आदिवासी जीवन यांचीही माहिती ग्रंथात विस्ताराने मांडली आहे. हा ग्रंथ विद्यापीठीय पदवी शिक्षण घेणाऱ्यांना निश्चित उपयोगी ठरणारा आहे.
आदिवासींची सामाजिक विभागणी कशा प्रकारे झाली आहे, त्यांचे व्यवसाय व परंपरा काय आहेत, जन्म, विवाह व मृत्यु यासमयी ते कोणते सोपस्कार करतात आणि पूर्वजांवर त्यांची किती गाढ श्रद्धा आहे या बाबींवर या ग्रंथामुळे चांगला प्रकाश पडेल. आदिवासी लोकांची जीवनपद्धती, त्यांचे लग्नविशेष, त्यांची श्रमपरिहाराची साधने, त्यांची कल्पनाशक्ती, त्यांचे धाडसी लौकिक जीवन, त्यांच्या सामाजिक परंपरा व धार्मिक विधी, त्यांच्या आशा आकांक्षा व त्यांचे भयगंड यासह ते निसर्गाच्या सान्निध्यात आपले जीवन कसे व्यतीत करतात त्याचे हे रेखीव चित्र आहे.

Reviews
There are no reviews yet.