स्त्री-पुरुष तुलना : मांग महाराच्या दू:खाविषयी निबंध

35.00

1 in stock

पुस्तकाचे नाव स्त्री-पुरुष तुलना : मांग महाराच्या दू:खाविषयी निबंध
लेखक ताराबाई शिंदे
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ५६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ७० ग्रॅम

Description

स्त्रीपुरुषतुलना

अलीकडे सर्व वर्तमानपत्रांत गरीब अबलांच्या दुष्कृत्यांविषयीं बरेंच छापून येतें, तरी हा महा अनर्थ मिटवून टाकण्यास तुह्यो कोणीच पुढे होत नाहीं याचें कारण काय बरें?

आहो, पुनर्विवाह न करण्याची चाल महान रोगांप्रमाणें अनेक ठिकाणर्णी व जातींत पसरली आहे. त्यामुळे किती लाखो व कोट्यावधि स्त्रिया वैधव्याचें असह्य दुःख कसकसें भोगीत असतील, व भोगितात व त्यापासून कसकसे अनर्थ होत आहेत व होत असतील याची कल्पनासुद्धां करितां येत नाहीं. कारण मनोनिग्रह करून मनुष्य वस्तींत राहून स्त्री धर्मरक्षण होणेंच नाहीं. क मनानें व नेत्रानें तरी त्या दोषाला पात्र होतातच. एक केश वपन केलें व दुसरें कुंकूं पुसून सर्व सौभाग्य हिसकून घेतलें, ह्मणून काय झालें ? त्यांचें अंतःकरण, बरें वाईटाचे विचार त्यांचेजवळच आहेत. सर्व बाह्य प्रकारांनीं नागविलें पण अंतर कोण नागवील? कारण स्त्रीधर्म म्हणजे काय? निरंतर पतीची आज्ञा पाळणें, त्याचे मर्जाप्रमाणें वागणें, त्यानीं लाथा मारिल्या, शिव्या दिल्या, दुसऱ्या रांडा ठेविल्या, नवरूजी दारू पिऊन, जुवा खेळून, कफलक होऊन, शंख करीत, चोरी करून, कोणाचा प्राण घेऊन, फितूर, चाहाडी, खजिना लुटून, लांच खाऊन जरी घरीं आले; तरी स्त्रियांनी आपले हे कोणी जसें कांहीं कृष्णमहाराजच गौळ्यांचें दहीं दूध चोरून चंद्रावळीला कलंक लावून आलेत; असें समजून परमात्म्यासारखीच यांची मोठ्या हासत मुखानें देवासारखी पूजा करावी, सेर्वेत हजर रहावें हा स्त्रीधर्म. पण जेथें बरे वाईटाचा विचार आहे तेथे स्त्रीधर्म कसा राहील; तेथे विकल्प तेव्हांच येईल कीं नाहीं; तेवढें एक परद्वारच केल्यानें पातिव्रत्य नेम मोडतो असें नाहीं. पातिव्रत्य मोडण्याला लक्षावधीं कारणें आहेत. देवासारखी नवऱ्याची पूजा करावी. आतां तशी पूजा कोणती करते; सावित्री आख्यानांत पतिव्रतेचे नेम सांगितलेले आहेत त्याप्रमाणें काटेतोल आज कोणती वागते. अशी एक उगीच दाखल्याला तर दाखवा बरें? 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्त्री-पुरुष तुलना : मांग महाराच्या दू:खाविषयी निबंध”

Your email address will not be published. Required fields are marked *