अभंग सेतू संत वचनांचे अनुवाद भाग – १

505.00

1 in stock

पुस्तकाचे नाव अभंग सेतू संत वचनांचे अनुवाद भाग – १
लेखक रवींद्र गोळे
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या २६४
आकार ६ * ९ इंच
वजन ३६० ग्रॅम

Description

महाराष्ट्रातील संत साहित्याच्या माध्यमातून सांस्कृतिक चळवळीला प्रारंभ झाला. संतांनी तत्कालीन गरजा  ओळखून समाजाला दिशा दिली. प्राप्त परिस्थितिनुसार समाजाला नवे विचार दिले. वर्णविषमता, कर्मकांड इत्यादीमुळे समाजातील सामान्य व्यक्तीच्या विकासाला वाव नव्हता. अशा परिस्थितीत संतांनी सामान्य माणसाला स्वधर्म, निती, समता, कर्तव्यबोध आणि एकूणच आत्मोद्धाराची शिकवण दिली. जी तत्कालीन समाजव्यवस्थेला हादरे देणारी होती. नव्या समाजाची पाराभरणी करणारी होती.

संत चळवळीने व संत साहित्याने जीवनातील मूलभूत प्रश्नांकडे संतांनी कानाडोळा केला नाही. आत्मसन्मान गमावलेल्या समाजाला संतांनी आत्मविश्वासाने, निर्भयपणे जगण्याचे बळ दिले. संतांनी कर्मनिष्ठा, भूतदया, प्रेम, दया, शांती, क्षमा, करुणा, परोपकार अशा अनेक मानवतावादी मूल्यांची शिकवणुक दिली . ज्ञान आणि कर्म यांची सांगड घालण्याचा  प्रयत्न केला. विवेकनिटी यांचा प्रचार केला. नीतिमुक्त जगण्याचा आग्रह धरला यामुळेच समाजात मूलगामी आणि दीर्घकालीन परिवर्तनाची पायाभरणी झाली.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अभंग सेतू संत वचनांचे अनुवाद भाग – १”

Your email address will not be published. Required fields are marked *