Description
चालुक्य – यादवांच्या काळात प्रबळ असणारी सनातनी वैदिक परंपरा आणि अंधश्रद्धेच्या पातळीवर पोहोचलेली शूद्रातिशूद्रांची बहुदैवतोपासना या सर्वांना बाजूस सारून संत नामदेवांनी पंढरपूरपासून पंजाबपर्यंत एक नवी भक्तिचळवळ उभी केली. त्याच्या मुळाशी ‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ ही आत्मभानाची प्रतिज्ञा होती. त्यामुळे नामदेवांची चळवळ ही भक्तीची किंवा मुक्तीची अशी मर्यादित न बनता अभिव्यक्तीच्या अधिकाराची चळवळ बनली. म्हणूनच पंढरपूरच्या महाद्वाराशी अठरापगड जातींचे लोक जमले. संतांची मांदियाळी निर्माण झाली. मराठी माणूस कर्मकांडांच्या, रुढीपरंपरांच्या दलदलीत रुतू नये म्हणून गेली सातशे वर्षे ही संतमंडळी अंभगातून कीर्तनातून नाचत, गर्जत राहिली. नामदेवांच्या कार्याची ही कालजयी फलश्रुती म्हणावी लागेल.

Reviews
There are no reviews yet.