Description
नव्या संशोधनावर आधारित शंभुराजांच्या खऱ्या इतिहासावर प्रकाश टाकणारे महत्त्वपूर्ण पुस्तक.
महत्प्रयासाने हाती सापडलेला हा महापराक्रमी व बुद्धिवान राजा आपल्या तावडीतून सुटू नये म्हणून औरंगजेबाने सर्वप्रथम त्यांचे डोळे काढले. परंतु स्वकीय इतिहासकारांनी हा राजकीय संघर्ष ‘धर्मसंघर्ष’ म्हणून नोंदवला. शिवाय जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा शंभूराजांची बदनामी केली, जेणेकरून मराठी माणसाला शंभूराजांबद्दल आत्मीयताच वाटू नये. वा. सी. बेंद्रे, डॉ. कमल गोखले, कॉ. शरद पाटील या सत्यशोधक इतिहासकारांच्या पंक्तीतील एक नाव म्हणजे आनंद घोरपडे ! सामान्य वाचकांना शंभूराजांच्या खऱ्या अभिमानास्पद इतिहासाचा परिचय करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आनंद घोरपडे यांनी या महत्त्वपूर्ण पुस्तकाद्वारे केले आहे. वास्तव इतिहास जाणून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक वाचकाने वाचलाच पाहिजे असा हा इतिहासग्रंथ आहे.

Reviews
There are no reviews yet.