मुखपृष्ठ / पुस्तक दालन / कवितासंग्रह / जीवनाची लय वेदनेत
जीवनाची लय वेदनेत
₹60.00 ₹55.00
1 in stock
| पुस्तकाचे नाव |
जीवनाची लय वेदनेत |
| लेखक |
आ . ह . साळुंखे |
| ISBN |
-- |
| भाषा |
मराठी |
| पुस्तक बांधणी |
पेपरबॅक |
| पानांची संख्या |
४८ |
| आकार |
५.५ * ८.५ इंच |
| वजन |
४० ग्रॅम |
Description
पत्नी जिवलग मित्र
जेव्हा होतो कोंडमारा
वाणी लपे ओठांआड
जिव्हाळ्याची माणसेही
सारी धुक्याच्या पल्याड
जेव्हा भूमिका आपली
नाही पोचतच नीट
कलुषित प्रतिबिंबे
चेहऱ्याची लागे वाट
वाट शोधे प्रकटण्या
अंतरीचा ज्वालामुखी
वाट मिळेना, राहीना
अंतरीही सुखासुखी
नसे साधन हातांशी
बाह्य संपर्कच भग्न
तेव्हा करावे मी काय ?
व्हावे स्वतःमध्ये मग्न !
स्मृतिशेष पत्नीलाच
व्हावे खुशाल संमुख
तिला सांगावी स्वतःची
जीवघेणी रुखरुख
लोक जाणतील सत्य
उरी ठेवावा विश्वास
पत्नी जिवलग मित्र
टिकवील श्वासोच्छ्वास
Reviews
There are no reviews yet.