Description
उमाजींना लोक ‘प्राईड ऑफ़ पुरंदर’ असे म्हणत असत. त्यांनी पुरंदर किल्ल्याला राजधानी बनवून तेथून काही काळ का होईना स्वराज्य चालवले होते. स्वाभाविकच, त्यांना ‘प्राईड ऑफ़ पुरंदर’ असे म्हणणे हे आनंददायक आहे !
उमाजी उमाजी । आठवण तुझी ।
हृदयांत ताजी । सकाळांच्या ।।
तुझे मनोबळ । जसे की वादळ ।
झाली तारांबळ । इंग्रजांची ।।
पराभवातही । स्वातंत्र्याची ग्वाही
दिशा आम्हां दाही । सांगतात ।।
तुझे समर्पण । नव्हे साधारण
त्याचे विस्मरण । होणे नाही ।।
असो कोई अज्ञ । अथवा सर्वज्ञ ।
सगळे कृतज्ञ । राहतील ।।
सगळे कृतज्ञ राहतील !

Reviews
There are no reviews yet.