Description
श्रमण संस्कृतीतून निर्माण झालेला जैन धर्म भारतात टिकून राहिला. पण बुद्ध धम्म लोप पावला याचे मुख्य कारण म्हणजे जैन धर्मात आत्म्याचे अस्तित्व मानले जाते. बुद्ध धम्म अनात्मवादी आहे. भगवान महावीरांना विष्णूचा अवतार मानण्याची कल्पना पुढे आली तेव्हा जैन धर्मीयांनी जागरूक राहून त्याचा कडाडून विरोध केला. जैनधर्मीय शुद्ध शाकाहारी असल्यामुळे गोमांस भक्षण करणे त्यांच्या धर्मविरुद्ध होते. आणि या इतर काही कारणांमुळे हिंदू धर्मीय लोकांनी जैन धर्मीयांना विरोध केला नाही. म्हणून जैन धर्म भारतात टिकून राहिला. भारताच्या बाहेर तिबेट, चीन, मंगोलिया वगैरे देशात महायानी बुद्ध धम्म अस्तित्वात आहे, तेथे सुद्धा देव-देवतांची उपासना केली जाते. पण तेथे भारतासारखी परिस्थिती नव्हती. म्हणून तेथे बुद्ध धर्माचे अस्तित्व टिकून राहिले आहे. मराठी वाचकांना जगातील बुद्ध धम्माची माहिती असावी म्हणून हा जगातील बुद्ध धम्माचा संक्षिप्त इतिहास लिहिला आहे.

Reviews
There are no reviews yet.