Description
या ग्रंथात सिद्धार्थ गौतम बुद्धाचे थोडक्यात चरित्र तर आहेच, त्याशिवाय बुद्ध धम्मानतील मूलभूत संकल्पनांचे विश्लेषणही आहे. धम्ममार्गीयांना या संकल्पना – बुद्ध, धर्म, संघ, मारविजय, बोधिसत्त्व, ब्रह्मदेव / ब्रह्मविहार, समाधी अशा अनेक संकल्पना वारंवार सामोऱ्या येतात. या संकल्पनांचे स्पष्टीकरण धर्मानंदांनी अत्यंत मनोवेधक पद्धतीने केले आहे. या ग्रंथास जोडलेल्या चार परिशिष्टांमधून व्याख्यान विषयांसंबंधी काही संकल्पनांचे स्पष्टीकरण करून त्रिपिटक ग्रंथाची सविस्तर रचना मांडलेली आहे. ज्या काळात ही भाषणे आयोजित केली गेली आणि त्यानंतर लिहून प्रकाशित करण्यात आली, त्या काळात आजच्या प्रमाणे ” बौद्ध जीवन मार्गाला धम्म्च म्हणावे धर्म म्हणू नये” असा आग्रह नव्हता किंवा इतरही काही विशिष्ट शब्द कर्मठपणाने वापरले जात नव्हते. ते इतर धर्म संकल्पनांना अनुरूप वाटावे असे आहेत. त्या काळात पाली भाषेचा प्रचार नसल्यामुळे हे संस्कृत प्रचूर शब्द धर्मानंदांनी या लेखनात योजले आहेत.

Reviews
There are no reviews yet.