फुले भारतातील जातीविरोधी चळवळीचे अग्रणी

45.00

50 in stock

पुस्तकाचे नाव फुले भारतातील जातीविरोधी चळवळीचे अग्रणी
लेखक याना शुरेनव्ह, सुमीत म्हसकर
ISBN 978-81-988449-3-4
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ४०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ५० ग्रॅम

Description

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात पश्चिम भारतातील जातिविरोधी चळवळीचा प्रारंभ बिंदू म्हणजे १८४८मध्ये सर्व जाती समुदायातील मुलींसाठी एक शाळा स्थापन करणे. शाळांच्या विकासाचा सखोल अभ्यास करण्यापूर्वी ही वस्तुस्थिती समजावून घेणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या जाती समुदायांचे भौतिक सह शालेय शिक्षण हे जात आणि अस्पृश्यतेच्या नियमांना थेट आव्हान होते. पण याची सुरुवात मुलींपासून का करावी ?

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत मुलींच्या शिक्षणाबाबत चर्चा सुरू झाली होती. आणि त्या काळात ती खूपच गाजत होती. वसाहतवादी सरकारांनी आणि भारतीय शिक्षकांनीही याला समर्थन दिले होते. लंडनस्थित ब्रिटिश अँड फॉरेन स्कूल सोसायटी नेटवर्कशी संबंधित मिशनरी आणि शैक्षणिक सुधारकांचा असा युक्तिवाद होता की ज्या माता त्यांच्या घरगुती कर्तव्यांमध्ये चांगल्या प्रकारे प्रशिक्षित आहेत त्या त्यांच्या समुदायाच्या नैतिक उन्नतीच्या प्रमुख घटक असू शकतात. जोतीराव फुले यांनी सामाजिक बदलाच्या प्रतिनिधी म्हणून मातांची ही कल्पना मांडली: ज्या पद्धतीने महिला आपल्या मुलांना दोन तीन वर्षांच्या वयात घडवू शकतात, तिथेच शिक्षणाचे बीज रुजने.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “फुले भारतातील जातीविरोधी चळवळीचे अग्रणी”

Your email address will not be published. Required fields are marked *