वादांची वादळे

225.00

1 in stock

पुस्तकाचे नाव वादांची वादळे
लेखक आ . ह . साळुंखे
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या --
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन --

Description

पायात घुसणारे काटे आम्ही काढायचे नाहीत काय ?

गोष्ट साधी सरळ आहे; आम्हाला स्वतंत्र माणूस म्हणून जगायचे आहे. आम्हाला कुणाशी भांडण करण्याची वा वाद घालण्याची हौस नाही. आम्ही स्व्त:हून कुणाच्या वाटेला जाऊ इच्छित नाही. आम्हाला आपले आमच्याच वाटेने जायचे आहे. आता, आमच्या या वाटेवर जेव्हा काटेकुटे आढळतात, तेव्हा ते बोचू नयेत म्हणून, आमच्या पायात घुसू नयेत म्हणून, ते बाजूला करणे भागच आहे. रस्त्यात जेव्हा काही दगडधोंडे येतात, तेव्हा ठेच लागू नये म्हणून ते दगडधोंडे बाजोला करावेच लागतात. वाटेत खाचखळगे बुजवावेच लागतात. आम्ही एवढेही करू नये, ऐसे ज्यांना वाटते, त्यांनी आमच्याबरोबर भांडण उकरून काढले, तर आम्ही काय करावे ? ते म्हणतील, की आम्ही गप्प बसावे, किंवा पळून जावे. आम्ही म्हणतो की आता आम्ही असे करणार नाही. आता आम्ही प्रतिहल्ला चढवू !

प्रश्न आहे आमच्या स्वातंत्र्याचा

आम्ही स्वतंत्र माणूस म्हणून जगनार, याचा अर्थ आम्ही इतरांकडून काही घेणारच नाही अथवा इतरांचे सर्व काही नाकारणार, असे मुळीच नाही. आमच्या भावविश्वामध्ये जगातील सर्व गोष्टींना प्रवेश असेल. मुद्दा एवढाच आहे, की या गोष्टींमधून काय घ्यायचे आणि काय घ्यायचे नाही, याचा निर्णय मात्र आम्ही स्वत:च करू. जे घ्यायचे ते आम्ही वेचून, निवडून घेऊ. त्याला आमच्या अगदी ‘स्व’ चा भाग बनवून टाकू. परंतु निवड करण्याचा अधिकार आम्ही दुसऱ्या कोणाला देणार नाही. त्यांच्या स्वत:च्या जीवनासाठी त्यांना जे हिताचे आणि आनंदाचे वाटत असेल, ते निवडण्याचा त्यांचा अधिकार जर आम्ही त्यांच्याकडून हिरावून घेत नाही, तर आमच्या बाबतीत तो अधिकार आपल्या हाती घेण्याचा अट्टहास त्यांनी तरी का बालगावा ? पुन्हा एकदा स्पष्ट करतो, की गोष्ट साधी, सरळ आहे. प्रश्न आहे आमच्या स्वातंत्र्याचा. या प्रश्नावर त्यांचे उत्तर काय आहे, यावर आमचे प्रत्युत्तर अवलंबून आहे !

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “वादांची वादळे”

Your email address will not be published. Required fields are marked *