Description
हिंदू धार्मिक – आध्यातिका परंपरा, केवळ हिंदू सामाजिक परंपरा नव्हे तर धार्मिक – आध्यात्मिक परंपरा, सामाजिक परिवर्तनाला विरोधी आहे अशी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांची प्रामाणिक समाजूटा आहे. बहुसंख्य हिंदू आजही जन्माधिष्ठित जातिव्यवस्थेत जगतात. ही विषमतेवर आधारलेली व्यवस्था सामाजिक परंपरेचा भाग असली तरी तिला चातुर्वर्ण्याच्या संकल्पनेचे अधिष्ठान आहे आणि चातुर्वर्ण्याच्या संकल्पनेला धार्मिक प्रामाण्य आहे. आजही खेडोपाडी पसरलेले सर्व थरांतील सवर्ण हिंदू अस्पृश्यता पाळतात आणि अस्पृश्यतेलाही धार्मिक प्रामाण्य आहे. आजही स्वामी अग्निवेश यांना दलित जातींना मंदिर प्रवेशाचा त्यांचा घटनानिविष्ट हक्क मिळवून देण्यासाठी सवर्ण हिंदूविरुद्ध आंदोलन उभारावे लागते अशी हिंदू समाजाला लाज आणणारी वास्तव परिस्थिती आहे.
पण समजा , भारतीय नैतिक – आध्यात्मिक परंपरेत ठाण असलेल्या पंडितांची आधुनिकतेशी गाठभेट पडली असती तर त्यांचा प्रतिसाद कसा राहिला असता ? आधुनिक नैतिक विचारातील कोणती मूल्ये आणि तत्त्वे त्यांना अभिनव, वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रमाण म्हणून भावली असती ? ती आत्मसात करायची तर स्वत:च्या परंपरेविषयीचे कोणते प्रश्न त्यांच्या दृष्टीने उपस्थित झाले असते ? आणि त्यांना कोणत्या प्रकारची उत्तरे त्यांनी दिली असती .
ह्या प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न ह्या लेखमालेत करण्यात आला आहे.
Reviews
There are no reviews yet.