Description
विज्ञानाच्या प्रगतीमुळे जीवनाच्या विविध क्षेत्रांत वस्तुत: फार मोठे परिवर्तन घडून आले आहे. परंतु धर्मकल्पनेचा ऐतिहासिक आढावा घेता, विज्ञानाच्या या युगात धर्मकल्पना अद्यापही यातु निर्भर अवस्थेतच वावरताना दिसते. विज्ञान कल्पनांनी यातु कल्पनेवर फार मोठा आघात केला आहे, तरीसुद्धा यातु विषयक धारणांतून समाजमन अद्यापि तरी बाहेर पडलेले नाही. धर्मकल्पना कुठल्या ना कुठल्या तरी श्रद्धेवर उभी असते; मानवी मन श्रद्धेत रमणरे, रस घेणारे आहे; श्रद्धेशिवाय ते राहूच शकत नाही; ती त्याची एक अंगभूत गरजच आहे. यामुळेच वेळोवेळी या श्रद्धेची छाननी करने, जुन्या त्याज्य श्रद्धांचे उल्लंघन करून चैतन्यपूर्ण नव्या श्रद्धांचा स्वीकार करने, व्यक्तीच्या व समाजाच्या संभरणासाठी अगत्याचे ठरते. आजच्या आव्हानांना खऱ्या पुरुषार्थाने सामोरे जावयाचे असेल, तर यातु निर्भरता व रूढ़ धर्मश्रद्धा यांतून माणसाने मुक्त झाले पाहिजे. श्रद्धेच्या नव्या वाटा शोधल्या पाहिजेत.
Reviews
There are no reviews yet.