Description
मानव समाज आज जिथे आहे, तेथपर्यंत तो अगदी प्रारंभीच पोचलेला नव्हता; आजचा टप्पा गाठण्यासाठी त्याला मोठमोठ्या संघर्षांना तोंड द्यावे लागले. मानव समाजाच्या प्रगतीचे तात्विक विवेचन मी माझ्या मानव समाज या ग्रंथात केलेले आहेच. या प्रगतीचे यथार्थ सरळ चित्रण देखील करता येण्यासारखे आहे. याच उद्देशाने मी ‘वोल्गा ते गंगा’ लिहिण्यास उद्युक्त झालो. मी या ग्रंथात हिंदी – यूरोपीय जातीविषयीच तेवढे लिहिण्याचे ठरविले; हेतु का की, भारतीय वाचकांना ग्रंथ समजण्यास सुगम व्हावा. मिसरदेशीय, असीरियन व सिन्धु जाती या प्रगतीच्या दृष्टीने, हिंदी – यूरोपीय मानाने हजारो वर्षे अगोदरच किती तरी पुढे गेलेल्या होत्या. पण त्या सगळ्यांचा अंतर्भाव या वर्तनात केला असता तर लेखक व वाचक या दोघांच्याही अडचणी वाढल्या असत्या. मी हर एक काळातील समाजाचे चित्रण प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
Reviews
There are no reviews yet.