Description
श्रावण वद्य द्वादशीच्या रात्री भिज पावसाच्या संततधारेत शिवाजी महाराज आग्ऱ्यावरून निसटले.
राजांना शोधण्यासाठी औरंगजेबाचं लाखोंचं सैन्य चौफेर घोंगावू लागलं.
आभाळातून कोसळणारा पावसाचा लोंढा.
गंगा, यमुना, सोने, गोदावरी, भीमा नद्यांना आलेला बेभान पूर.
नेटक्या मार्गावरून प्रवास करावा, तर मुघली गस्तीचा जाच.
अरण्यातून वाट तुडवावी, तर मार्ग अनभिज्ञ.
जगण्याचीच शाश्र्वती नसेल, तिथं आहाराचा मुद्दाच बेदखल.
अशा काळ्याकठोर नियतीच्या छाताडावर पाय रोवून
राजे राजगडी पोहोचले.
कसे ?
उत्तर हेचि ‘साधू’
शिवाजी महाराजांच्या आग्रा ते राजगड या प्रवासाची थरारक कादंबरी.
Reviews
There are no reviews yet.