Description
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. डॉ. आंबेडकर हे ज्ञानोपासक होते. ज्ञान ही शक्ती आहे यावर त्यांची नितांत श्रद्धा होती. डॉ. आंबेडकर हे युगकर्ते होते. त्यांनी निर्माण केलेले युग हे सामान्य माणसाला लोकशाहीच्या क्षितिजावर उभे करणारे युग होते. न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या चार मूलभूत तत्त्वांवर त्यांना भारतीय समाजाची पुनर्रचना करावयाची होती. समता व बंधुत्व या दोन मूल्यांचा भारतीय समाजव्यवस्थेमध्ये अभाव होता. म्हणून ती रुजवण्याचा त्यांनी आयुष्यभर अथकपणे प्रयत्न केला. स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या तीन शब्दांतून त्यांनी आपल्या जीवनाचे तत्त्वज्ञान गुंफले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते नव्हते, ते सबंध राष्ट्राचे नेते होते आणि म्हणून राष्ट्रनायक होते. त्यांचा लढा हा मानवमुक्तीचा लढा होता. भारतातील राजकीय लोकशाहीला सामाजिक व आर्थिक आयाम देण्याची त्यांची आंतरिक तळमळ होती. श्री. मोगल जाधव यांनी लिहिलेल्या छोटेखानी पुस्तिकेत समग्र डॉ. आंबेडकर आढळणार नाहीत; परंतु डॉ. आंबेडकरांनी ‘समता’ हे मूल्य धारदार करण्यासाठी दिलेल्या संघर्षमय लढ्यांची अत्यंत ओघवत्या व सुटसुटीत भाषाशैलीत मांडणी केली आहे.
Reviews
There are no reviews yet.